5 State Election : राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात, शऱद पवारांची मोठी खेळी

5 State Election : देशात पाच राज्यातील निवडणूकींचा बिगूल वाजला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही निवडणूकीसाठी रणशिंग फुंकले आहे. तर तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार असल्याची भुमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

Update: 2022-01-11 14:26 GMT

उत्तरप्रदेशसह पंजाब, मणिपुर, गोवा आणि उत्तराखंड राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच सक्रीय झाला आहे. तर मंगळवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भुमिका व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस उत्तरप्रदेश, मणिपुर आणि गोवा या राज्यात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

यावेळी उत्तरप्रदेशातील काँग्रेस नेते सिराज मेहंदी यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, उत्तरप्रदेशात राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांची मोट बांधून भाजपाला पर्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जागावाटपाबाबत समाजवादी पक्षाच्या नेत्यांसोबत राष्ट्रवादीचे नेत्यांची चर्चा सुरू आहे. तसेच उत्तप्रदेशात सिराज मेहंदींसोबत प्रचारात सहभागी होणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच उत्तरप्रदेशात भाजपाच्या विरोधात मोठी लाट तयार झाली तर मणिपुर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार आहे. तर तेथे राष्ट्रवादी पाच जागांवर निवडणूक लढणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

गोवा विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादीतर्फे प्रफुल्ल पटेल काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेससह समविचारी पक्षांशी चर्चा करत आहेत. तर गोव्यातही राष्ट्रवादी काँग्रेस समविचारी पक्षांसह भाजपाला पर्याय उभा करणार आहे, असे मत व्यक्त करत गोव्यातही परिवर्तन अटळ असल्याची भविष्यवाणी शरद पवार यांनी केली. 

Tags:    

Similar News