उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं यावर सहमती झाली आहे – शरद पवार

Update: 2019-11-22 17:20 GMT

आज मुंबईत काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत या तीन पक्षातील शिर्षस्थ नेत्यांमध्ये बैठक झाली.

या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलतानाउद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार बनायला हवं याबद्दल कोणाचंच दुमत नाही. पण अजूनही काही मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा सुरु आहे. उद्या या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल,"अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा

टाटाचे कॅन्सरग्रस्त रुग्ण हिंदमातेच्या पुलाखाली

विद्यार्थी आंदोलनातून सत्तापालट होतो, याचा मोदींना पडला विसर !!!

“जेएनयू” च्या निमित्ताने….

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत, यांच्यासह आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवार आणि सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. या भेटीनंतर खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बातचित केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल परवा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भात ही भेट मह्त्वाची होती.

महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. त्यातच शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवूनही सत्ता स्थापन केलेली नाही. शिवसेनेने युतीमध्ये सत्तेचे समसमान वाटप हे सूत्र समोर ठेवलं होतं. या सुत्रानुसार मुख्यमंत्री पद देखील समान तत्त्वावर असावं. असं शिवसेनेचं म्हणणं होतं. त्यामुळं शिवसेनेनं भाजपशी राजकीय फारकत घेतली आहे.

आता शिवसेना, कॉंग्रेस- राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करणार आहे. सत्ता स्थापन करण्या संदर्भात शिवसेना आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीने ने कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्वाची आहे.

त्यामुळं शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी शेतकऱ्यांची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

Similar News