शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, कशी आहे पवारांची प्रकृत्ती

शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, कशी आहे पवारांची प्रकृत्ती Sharad Pawar gallbladder surgery done on Sharad Pawar

Update: 2021-04-12 07:07 GMT

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर आज ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहें. शरद पवार यांच्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया पार पडली आहे. गेल्या आठवड्यात पवार यांच्या पोटात वेदना जाणवल्यानं त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्त्यांच्या पोटातील पित्ताशयाचे खडे इंन्डोस्कोपीद्वारे काढण्यात आले होते. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर पवार यांच्यावर आता दुसरी शस्त्रक्रिया झाली आहे.


पहिल्या शस्त्रक्रियेनंतर पवार यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर १५ दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र, त्या अगोदरच पवार यांच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली. या संदर्भात नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. शरद पवार यांच्यावर पित्ताशयावर Laparoscopy द्वारे आज यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. सध्या त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Tags:    

Similar News