राहुल गांधी यांच्या कार्यालयावर हल्ला

Update: 2022-06-24 14:37 GMT

राहुल गांधी यांच्या लोकसभा मतदार संघातील कार्यालयावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. तर या घटनेवरून काँग्रेसनेत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

केरळ राज्यातील वायनाड हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राहुल गांधी यांचे कार्यालय आहे. तर या कार्यालयावर दुपारी 3 वाजता च्या सुमारास हल्ला करण्यात आला. यामध्ये कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप भारतीय युवा काँग्रेसने ट्वीट करून केला. तर या हल्ल्यास स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया ही संघटना कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे सीपीएम ची सत्ता असलेल्या केरळमध्ये विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशातील अमेठी मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यावेळी राहुल गांधी हे केरळमधील वायनाडमधून निवडून आले होते. तर आज दुपारी 3 च्या सुमारास स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी झेंडे घेऊन खिडकीवर चढत तोडफोड केली, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे राहुल गांधी अडचणीत आले आहेत. त्यापार्श्वभुमीवर आता राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याने काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.



स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया ही संघटना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट या पक्षाची संघटना असल्याचे म्हटले जात आहे.

Tags:    

Similar News