...तर सरकार चालवणे कठीण होईल - संजय राऊत

Update: 2021-03-22 05:20 GMT

परम बीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करुन सत्य बाहेर आणले जाईल असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. या निर्णय़ाचे समर्थन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला निर्णय योग्यच आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. जर कुणी काहीही आरोप केले आणि त्याच्यामुळे मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला लागलो तर सरकार चालवणे कठीण होऊन जाईल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सचिन वाझे प्रकरणी परम बीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे. याचसंदर्भात रविवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत बैठका घेतल्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते. यानंतर दिवसभर झालेल्या चर्चेनंतर तूर्तास अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला. माजी अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुढे काय करायचे याचा निर्णय घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांनी घेतला. पण त्यानंतर रिबेरो यांनी मात्र आपण या तपासासाठी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केल आहे. दरम्यान गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपांची चौकशी केल्यानंतर या आरोपात कितपत तथ्य आहे हे समोर येईल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.

Tags:    

Similar News