तेव्हा ‘ते’ गोधडीत रांगतही नव्हते - संजय राऊत

Update: 2019-11-18 04:47 GMT

राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावर झालेल्या वादाचे पडसाद आता दिल्लीत पाहायला मिळत आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेत विधानसभा निवडणूकीनंतर सत्ता स्थापने संदर्भात झालेल्या वादानंतर एनडीएचा सर्वात जुना घटक पक्ष असलेली शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेना खासदारांची जागा देखील बदलली आहे. त्यामुळे शिवसेना खासदार आता विरोधी बाकावर बसणार आहेत.

हे ही वाचा...

पुण्याचे व्हायरल स्वच्छता सेवक

मुख्यमंत्री सहायता निधी त्वरीत सुरू करावा- आदेश बांदेकर

मी पुन्हा येईन… शिवसैनिकांची देवेंद्र फडणवीसांसमोर घोषणाबाजी

शिवसेना खासदारांची जागा बदलल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. “शिवसेना ‘एनडीए’चा संस्थापक घटक पक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एनडीएचे संस्थापक होते. जॉर्ज फर्नाडीस निमंत्रक होते. फर्नाडीस हे ‘एनडीए’तील सर्व घटक पक्षांशी संवाद साधायचे. ‘एनडीए’च्या नावानं टिव-टिव करणारे ज्यावेळी एनडीए स्थापन झाली, तेव्हा गोधडीत रांगतही नव्हते’’ असा टोला भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. दरम्यान राज्यात कॉंग्रेस,(Congress) राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

Similar News