संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; नव्या समिकरणांची नांदी?

Update: 2019-11-06 05:08 GMT

शिवसेना खासदार संजय राऊत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट होणार आहे. या भेटीत नवी राजकीय समीकरणं जुळून येतात का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ११.३० वाजता राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन शरद पवारांना भेटणार आहेत.

शरद पवार यांनी आज दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या पत्रकार परिषदेत पवार आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याआधी संजय राऊत हे शरद पवारांची भेट घेणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

काही वेळापूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस यशोमती ठाकूर यांचीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे हे देखील थोड्या वेळात पवार यांना भेटणार आहेत. त्यामुळे आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असं चित्र रंगू लागलंय.

Similar News