Diwali 2022 : शेकडो मशालींनी उजळला सज्जनगड

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वास्तव्य केलेल्या सज्जनगड किल्ल्यावर दिवाळीनिमीत्त मशाल उत्सव साजरा करण्यात आला.

Update: 2022-10-24 19:22 GMT

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि समर्थ रामदास (Samarth Ramdas) यांनी वास्तव्य केलेल्या सज्जनगडावर (Sajjangad) दिवाळीच्या पहिल्या पहाटेच्या निमीत्ताने हजारो मशाली पेटवून मशाल उत्सव साजरा केला. यावेळी सज्जनगडाच्या महाद्वार आणि बुरुजावर विद्यूत रोषणाई व फुलांचे तोरण बांधण्यात आले होते. यावेळी समाधी मंदिर आणि श्रीधर कुटी (Shridhar kuti) येथे फुलांची आरास करण्यात आली होती. त्यामुळे सज्जनगडाला विशेष सौंदर्य प्राप्त झाले होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत शिवप्रेमींनी मशाल उत्सव साजरा केला. यावेळी हजारो मशाली प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. दरम्यान भातखळे वाहनतळ येथून फुलांनी सजवलेल्या पालखीत शिवाजी महाराजांच्या चांदीच्या मुर्तीची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे दिवाळीच्या पहाटे सज्जनगडावर यात्रेचे स्वरुप निर्माण झाले होते.

टीम दुर्गसंवर्धनाच्या माध्यमातून सज्जनगड येथे आगीचे खेळ करण्यात आले. यावेळी कोल्हापुरसह विविध जिल्ह्यातून शिवप्रेमी सज्जनगडावर दाखल झाले होते. तसेच 2020 पासून टीम दुर्गसंवर्धनाच्या माध्यमातून सज्जनगडावर सुरु असलेल्या उत्सवाचे शिवप्रेमींकडून कौतूक करण्यात आले.

Tags:    

Similar News