सचिनचं ट्विट शरद पवारांचा सचिन तेंडूलकरला सल्ला...

Update: 2021-02-07 03:57 GMT

रिहानाच्या ट्विटवरून सुरु झालेली चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीए. रिहानाला उत्तर देण्यासाठी सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) ने ट्विट करत "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही." बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया. असं ट्विट करत रिहानाला उत्तर दिलं होतं.

काय म्हटलं होतं रिहानानं? (Rihanna)

रिहानानं सीएनएन या वृत्तवाहिनीचा शेतकरी आंदोलनावरील एक रिपोर्ट ट्विट केला होता. या ट्विट मध्ये आपण यावर बोलायला हवं. असं म्हटलं होतं.


त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सचिन तेंडूलकर ला सल्ला दिला आहे. भारतातील सेलिब्रेटींनी जी भूमिका घेतली त्याबद्दल सामान्य लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टी बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनाबाबत शरद पवारांनी काय म्हटलंय?( Sharad Pawar on Farmer Protest)

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. आंदोलक रस्त्यावर येऊ नये यासाठी खिळे ठोकून रस्ता बंद करण्याबदलाची अति टोकाची भूमिका सरकारने घेतली आहे. याबद्दल सरकारचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. तरीही देशाचा अन्नदाता रस्त्यावर अशा प्रकारे बसतो. त्यावेळेस त्याच्याबद्दलची सामंज्यस्यता दाखवण्याची आवश्यकता आहे. आता या आंदोलनालाबाबत आता देशाबाहेर सहानभूती व्यक्त होऊ लागली आहे.

Tags:    

Similar News