#Farmer Protest : शेतकरी आंदोलनावर न बोलणारे सेलिब्रिटी आता का बोलू लागले?

दिल्लीच्या सीमेवर भर थंडीत बसून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल न बोलणाऱ्या सेलिब्रिटींना अचानक मौन का सोडले असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Update: 2021-02-03 15:26 GMT

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हॉलिवूड तसंच परदेशातील विविध क्षेत्रातील लोकांनी पाठिंबा दिल्यानंतर या आंदोलनाची जागतिक पातळीवर चर्चा सुरु झालेली आहे. पण से असताना आता या कलाकारांना उत्तर देण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, अक्षय कुमार, करण जोहर, अजय देवगण मैदानात उतरले आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मौन बाळगणाऱ्या या सेलिब्रिटींनी रिहाना, ग्रेटा, अमंडा यांच्या ट्विटनंतर मात्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यामध्ये सचिन तेंडुलकरने ट्विट करत, "भारताच्या सार्वभौमत्वाशी कधीही तडजोज केली जाणार नाही. बाहेरच्यांनी फक्त पाहावे पण हस्तक्षेप करुन नये. भारतात काय करायेच ते ठरवण्यास भारतीय सक्षम आहेत. देश म्हणून आपण एकत्र राहूया" असे म्हटले आहे.

यावर सचिन तेंडुलकरला नेटिझन्सने चांगलेच ट्रोल केले आहे. भारताचे सार्वभौमत्व हे सरकारमध्ये नाही तर शेतकरी, सैनिक, सामान्य नागरिक यांच्यात आहे, असे एकाने सुनावले आहे. तर काहींनी शेतकऱ्यांवर लाठीमार सुरू होता तेव्हा तुम्ही कुठे होता, असा सवाल विचाराला आहे.

तर अभिनेता अक्षय कुमार यानेही ट्विट करुन शेतकरी हे या देशाचा महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. कुणीतरी फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, त्याकडे लक्ष देण्याऐवी यावर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे म्हटले आहे.


तर अजय देवगणने, भारत आणि भारतीय धोरणांविरोधातल्या खोट्या प्रपोगंडाला बळी पडू नका. याक्षणी सगळ्यांनी एकत्रितपणे उभे राहण्याची गरज आहे, असे म्हटले आहे.

तर करण जोहरनेही ट्विट केले आहे. आपण सध्या तणावाच्या परिस्थितीत आहोत. या क्षणाला संयमाची गरज आहे. प्रत्येकाला फायद्याचा ठरेल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. शेतकरी हे आपल्या देशाचा कणा आहेत. कुणालाही आपल्यामध्ये फूट पाडू देऊ नका, असे त्याने म्हटले आहे.

तर भारतीय क्रिकेट टीमचे कोच रवी शास्त्री यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती हा महत्त्वाचा भाग आहे. शेतकरी हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. हा आपला अंतर्गत विषय आहे आणि मला विश्वास आहे की चर्चेतून यावर तोडगा निघू शकेल.


Tags:    

Similar News