जगातील पहिली लस तयार, लवकरच उत्पादन सुरू होणार

Update: 2020-08-11 09:38 GMT

संपूर्ण जग कोरोनावरील ज्या लसीची वाट पाहत आहे ती लस अखेर तयार झाली आहे. रशियाने यामध्ये आघाडी घेत मंगळवारी या लसीची नोंदणी केल्याची घोषणा रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी केली आहे. लवकरच या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले जाईल अशी माहितीही पुतीन यांनी दिली आहे.

या लसीचा एक डोस आपल्या मुलीलाही दिला गेल्याची माहिती पुतीन यांनी दिली आहे. एवढेच नाहीतर “या लसीच्या प्रयोगामध्ये आपली मुलगीही सहभागी होती. तिला पहिल्यांदा डोस दिला गेला तेव्हा ताप भरला होता, हा १०० पर्यंत गेला होता. पण दुसऱ्या दिवश ताप कमी झाला” अशी माहिती पुतीन यांनी दिली आहे. दरम्यान रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी रशियन मायक्रोबायोलॉजी सेंटर गेमेलियाने तयार केलेल्या लसीची नोंदणी करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसंच ही लस सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पण या लसीबद्दल अधिक माहिती रशियातर्फे देण्यात आलेली नाही.

Similar News