पश्चिम बंगाल विधानसभेत अभुतपूर्व रणकंदन: भाजपा आणि तृणमूलच्या आमदारांमध्ये हाणामारी

Update: 2022-03-28 09:32 GMT

संघर्षाची पार्श्वभुमी असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत अभुतपूर्व रणकंदन झाले आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये यावेळी जोरदार हाणामारीनंतर यानंतर भाजपाच्या पाच आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावेळी भाजपा आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तर तृणमूलचे आमदार असित मजुमदार यांनी हाणामारीत आपण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

विधानसभेतील एका व्हिडीओमधे आमदार एकमेकांना ढकलत असून हाणामारी करत असल्याचं दिसत आहे. तसंच शर्ट फाडत असल्याचंही दिसत आहे. "त्यांना मला ढकललं, शर्ट फाडला," असं ते सांगत आहेत.

यानंतर भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला. आम्ही बिरभूममधील घटनेवर चर्चेची मागणी करत असताना सत्ताधारी आमदारांनी आम्हाला मारहाण केल्याचं सांगत ते सभागृहातून बाहेर पडले. निलंबित करण्यात आलेल्या भाजपाच्या आमदारांमध्ये सुवेंद्रू अधिकारी, मनोज तिग्गा, नरहरी महतो, शंकर घोष, दीपक बर्मन यांचा समावेश आहे.

Tags:    

Similar News