#Rihanna: शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानं रिहानाचा काय फायदा झाला?

Update: 2021-02-06 12:42 GMT

अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने (Rihanna) शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियासह सर्व मुख्य माध्यमांवर चांगलीच चर्चा सुरु आहे. रिहानाने सीएनएन चॅनलचा एक रिपोर्ट ट्विट केला होता. त्यावर तिने 'आपण यावर का बोलत नाही'? असा सवाल तिने केला होता.त्यानंतर तिला कंगना रनौत ने ट्रोल केलं असलं तरी भारतातील अनेक कलाकारांनी तिला सपोर्ट देखील केला आहे.

विशेष बाब म्हणजे गेल्या 5 दिवसात तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 
एका अहवालानुसार (Rihanna) चे ट्विटर वरील फॉलोअर्स ची संख्या जवळ जवळ 3 लाखांनी वाढली आहे. 1 फेब्रुवारीला रिहाना चे फॉलोअर्स 100,883,133 इतके होते. आता ती संख्या 100,985,544 वर पोहोचली आहे.




 


Tags:    

Similar News