देशातील 6 एयरपोर्ट्स चा होणार लिलाव: अर्थमंत्री निर्मला सितारमण

Update: 2020-05-16 12:05 GMT

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज च्या संदर्भात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था आणि कृषी क्षेत्रासाठी आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या आहेत. आज याच पॅकेजच्या चौथ्या टप्प्यामध्ये पायाभूत सुविधांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण आठ मोठ्या क्षेत्रांसाठी घोषणा करत आहेत. त्या अंतर्गत पीपीई मॉडेलद्वारे 6 विमानतळ विकसित केले जातील. अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

पीपीई मॉडेलद्वारे 6 विमानतळ विकसित करण्यासाठी देशातील 6 विमानतळांचा लिलाव केला जाणार आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडे याची जबाबदारी असेल. वेळेला किंमत असते आणि वेळ वाचवणं महत्वाचं आहे. त्यामुळं हा निर्णय घेण्यात येत असल्याचं सितारमण यांनी म्हटलं आहे.

देशातील नागरिकांना विमानाने लांबून प्रवास करावा लागतो. त्यामुळं आता हा प्रवास सोपा केला जाणार आहे. या निर्णयानं भारतीय हवाई क्षेत्राचा वापर स्वस्त होणार आहे. यामुळे हवाई क्षेत्राला 1 हजार कोटी मिळतील, इंधानाची बचत होईल. येत्या दोन महिन्यात यासंदर्भात निर्णय प्रक्रिया पूर्ण होईल.

Similar News