कॉंग्रेसच्या एकेकाळच्या ‘या’ दिग्गज नेत्याचा फोटो फेकला काँग्रेस ऑफिसच्या बाहेर...

Update: 2019-09-12 11:31 GMT

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश करताच त्यांच्या पुण्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात असलेला फोटो भिंतीवरून उतरवून काँग्रेस भवनाच्या बाहेर काढण्यात आला. पुणे शहर सोशल मीडिया अध्यक्ष पुरंदरे यांनी तसा फोटो आपल्या फेसबुक वर व्हायरल केला आहे, या फोटोला ‘काँग्रेस भवनाच्या गॅलरीत पडलेला फोटो’ असा कॅप्शन देत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद त्यांनी व्यक्त केली आहे.

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करून स्वपक्षातील काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्या तिकिटासाठी हवा तितका आग्रह धरलेला नव्हता असा आरोप केला होता. पाटील यांच्या या नाट्यमय घडामोडीवर अखेर काल भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर पडदा पडलेला दिसतो. ऐकीकडे त्यांचा मुबंईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश झाला आणि दुसरीकडे काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांना फोटोसहीत बाहेर काढल्याचे फोटो व्हायरल झाले, हा फोटो नेटकऱ्यांच्या बाबतीत चांगलाच करमणुकीचा विषय झाला आहे, फेसबुक वरील फोटोखालील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कमेंट जर पहिल्या तर पक्ष बदलणाऱ्या नेते मंडळी वर संपूर्ण नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

Similar News