Ratnagiri | एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व जनतेने मान्य केले – योगेश कदम
कोकणात शिवसेनेचा विजय म्हणजे मुंबई महापालिकेच्या विजयाची नांदी योगेश कदमांच वक्तव्य
रत्नागिरी: नगरपरिषद निवडणुकांतील निकालांनंतर शिवसेना (शिंदे गट) नेते योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केल्याचं म्हटलं आहे. “कोकणातील जनतेने एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं आहे,” असा ठाम दावा राज्य मंत्री योगेश कदम यांनी केला.
योगेश कदम म्हणाले, “कोकणातील शिवसेनेचा विजय हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरता मर्यादित नसून, तो आगामी मुंबई महानगरपालिकेच्या विजयाची नांदी आहे. कोकण म्हणजेच शिवसेना हे समीकरण जनतेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे.”
खेड नगरपरिषदेबाबत बोलताना ते म्हणाले, “१४ वर्षांनंतर खेड नगरपरिषद पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. हा विजय कोकणातील जनतेचा शिवसेनेवरील विश्वास दर्शवतो.”
ते पुढे म्हणाले, “या निकालांमुळे कोकणात शिवसेना अधिक मजबूत झाली असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नव्या ताकदीने पुढे जात आहे. जनतेने दिलेल्या या कौलामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.”