रामनवमीच्या वेळेस नॉनव्हेज खाऊ नये

Update: 2022-04-11 11:51 GMT

दिल्लीत असणाऱ्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठ(JNU) सातत्याने चर्चेचा विषय असतो. त्यातच रामनवमी दिवशी मांसाहार (NonVeg) करु नये अशी भूमिका मांडत उजव्या विचाऱ्यांच्या संघटनांनी डाव्या विचारसरणीच्या लोकांवर जबरदस्ती केली.हा मुद्दा चर्चेत आला.या मुद्द्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas athawale) यांनी रामनवमीच्या वेळेस नॉनव्हेज (NonVeg) खाऊ नये, अशी भूमिका मांडली आहे.

रामदास आठवले म्हणाले, रामनवमीच्या वेळेस नॉनव्हेज खाऊ नये "व्हेज आणि नॉनव्हेज संघर्ष होता कामा नये. भारतात सगळ्या जाती धर्माची माणसं राहतात. सगळ्यांनी एकमेकांचा आदर करायला पाहिजे, मी या मताचा आहे"असं मत यावेळी रामदास आठवले म्हणाले आहेत.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) कावेरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये रविवारी हिंसक संघर्ष झाला, ज्यात एबीव्हीपी (ABVP) आणि डाव्या संघटनांचे १० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी रविवारी कावेरी वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी रामनवमी पूजा आणि हवनाचे आयोजन केले होते. तर दुसरीकडे होस्टेल परिसरात इफ्तार पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीसाठी मांसाहारही ठेवण्यात आला होता. यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. रामनवमीची पूजा सुरु असल्याने आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने हॉस्टेल मेसच्या मेनूमध्ये मांसाहाराचा समावेश करु नये, अशी भूमिका एबीव्हीपीने मांडली. यावरुनच पुढे दोन गटांत राडा झाला.

Tags:    

Similar News