'ती' क्लिप डिलीट केली आणि नंतर एडीट केली सरकारचा सरळ सरळ हस्तक्षेप

Update: 2019-07-31 03:25 GMT

सोशल मिडीयावर व्हायरल झालेली ती क्लिप अखेर युट्युब चॅनेलवरून डिलीट करण्यात आली. त्यानंतर काही वेळाने ती एडीट करून पुन्हा पोस्ट करण्यात आली. माहिती अधिकार कायद्यात दुरूस्ती करून सरकार महत्वपूर्ण माहिती दडपत आहे असा आरोप करणाऱ्या खासदाराच्याच क्लिप सोबत राज्यसभा टीव्हीने छेडछाड केली आहे. सभागृहामध्ये राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी जशोदाबेन यांचा उल्लेख करत त्यांच्या आंदोलनाची बातमी कशा पद्धतीने दाबण्यात आली, तसंच त्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कशी माहिती देण्यात आली नाही याचा उल्लेख केला. सभागृहाच्या कामकाजाचा भाग झालेल्या या भाषणातील जशोदाबेन यांचा उल्लेख असलेली क्लिप राज्यसभा टीव्हीच्या युट्यूब चॅनेलवरून डिलीट करण्यात आली.

ओरिजनल क्लिप - कुमार केतकर यांचं भाषण 6 मिनिट 18 सेकंदाचं आहे. हे पूर्ण भाषण ऐका.

Full View

आता ही दुसरी क्लिप बघा – ही क्लिप प्ले च होत नाही. ही आहे कुमार केतकरांच्या भाषणाची राज्यसभा टीव्ही वरच्या क्लिपची लिंक. जशोदाबेनचा तसंच पंतप्रधान असा उल्लेख असल्याने राज्यसभा टीव्हीने ती काढून टाकलीय.

https://www.youtube.com/watch?v=u7SawIJY9sA&feature=youtu.be

आता ही तिसरी क्लिप बघा – ही क्लिप 6 मिनिट 13 सेकंदाची आहे. यातील 5 सेकंद गायब आहेत. पंतप्रधान आणि जशोदाबेन असा उल्लेख असलेला भाग वगळण्यात आलेला आहे.

Full View

वास्तविकतः जर सभापतींचे निर्देश असतील तरच सभागृहाच्या कामकाजातील काही भाग वगळला जातो. मात्र, इथे राज्यसभा टीव्ही ने स्वतःहून सदस्याचं भाषण एडीट केलंय. हा विशेषाधिकार भंगचं प्रकरण ही होऊ शकतं.

Similar News