...अखेर शरद पवार शपथ घेणार

Update: 2020-07-22 03:37 GMT

गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा ( Rajyasabha MP Oath Ceremony) रखडलेला शपथविधी सोहळा आज पार पडत आहे. दिल्लीच्या राज्यसभा सदनात 11 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील 6 खासदार शपथ घेणार आहेत. फौजिया खान यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानं त्या उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

मार्च महिन्यात राज्यसभेच्या निवडणूका पार पडल्या होत्या. राज्यातील या निवडणूका बिनविरोध पार पडल्या होत्या.

महाराष्ट्रातून कोण घेणार शपथ?

शरद पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस

प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना

राजीव सातव, कॉंग्रेस

छत्रपती उदयनराजे भोसले, भाजप

रामदास आठवले, रिपाई

डॉ. भागवत कराड, भाजप

 

Similar News