दिल्लीः राजू शेट्टी यांची नव्या शेतकरी संघटनेची घोषणा

Update: 2022-03-22 11:09 GMT

संयुक्त किसान मोर्चाच्या व्यतिरिक्त दिल्लीत आज MSP गॅरंटी मोर्चा या नवीन शेतकरी संघटनेची बैठक पार पडली. विशेष बाब म्हणजे ही बैठक शेतकरी आंदोलना चेहरा राहिलेल्या राकेश टिकैत यांच्या अनुपस्थित पार पडली. या बैठकीला शेतकरी नेते व्ही के सिंह, राजू शेट्टी यांच्यासह देशभरातील शेतकरी नेते उपस्थित होते.

MSP च्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी या नवीन संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे नाव MSP गॅरंटी मोर्चा आहे. या बैठकीला माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शेट्टी यांनी या नवीन संघटनेखाली देशभरातील संघटना एमएसपीच्या मागणीसाठी एकत्र येतील. असा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

या पुढे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांच्या झेंड्याखाली आंदोलन होणार नाही. तर यापुढे आंदोलन एमएसपी गॅरंटी मोर्चा च्या झेंड्याखाली आंदोलन होईल. अशी माहिती शेट्टी यांनी दिली आहे.


काय असेल संघटनेचा कार्यक्रम?

पुढील 6 महिन्यात एमएसपीसाठी देशभरात मोर्चे काढले जातील.

गाव समिती राष्ट्रपतींच्या नावाने एमएसपीच्या मागणीसाठी ठराव करेल.

6 महिन्यानंतर दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन घेतलं जाणार

Tags:    

Similar News