महाराष्ट्रात १ मेपासून लसीकरण सुरू होऊ शकेल: राजेश टोपे

Update: 2021-04-30 11:52 GMT

महाराष्ट्रात दररोज कोरोनाचे 60 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. राज्यात गेल्या 15 दिवसांपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तरीही रुग्णसंख्या घटताना दिसत नाही. त्यातच कोरोनाविरोधात मोठं हत्यार समजली जाणारी लस देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यानं लसीकरण देखील ठप्प आहे.

दरम्यान केंद्र सरकारने लोकांना 1 मे पासून 18 वर्षापुढील लोकांना लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, राज्यांकडे लस नसताना त्यांनी लसीकरणाचा कार्यक्रम कसा सुरु करायचा? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असताना महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाबाबत सूतोवाच केलं आहे.

१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल. पण नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल, त्यांनीच संबंधित केंद्रावर जायला हवं. सुरुवातीला जिल्ह्यात एखादं केंद्र असू शकेल. त्यामुळे ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच केंद्रावर जावं. लस अतिशय नाममात्र स्वरूपात आहे. आम्ही सिरमला पत्र लिहिले होते. त्यांनी सांगितलं मे महिन्यात १३ ते १४ लाख लसीचे डोस देऊ. भारत बायोटेक कोवॅक्सिनचे ४ ते साडेचार लाख डोस देऊ शकेल. दोघांची बेरीज १८ लाखांपर्यंत जाईल. त्यादृष्टीने १८ ते ४४ वयोगटासाठी कमी केंद्रांवर लसीकरण सुरू करू शकलो, तर ते करता येऊ शकेल. पण एक नक्की आहे की केंद्र खूप कमी ठेवले, तर जास्त कालावधीसाठी लसीकरण सुरू राहीलं

असं म्हणत राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाबाबत सुतोवाच केलं आहे.

Tags:    

Similar News