Rajasthan Political Crisis: मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा पंतप्रधानांना फोन

Update: 2020-07-27 08:55 GMT

राजस्थान मधील राजकीय संकट थांबण्याचं नाव घेत नाही. विधानसभेचे अध्यक्ष सी. पी जोशी यांनी राजस्थान चे राज्यपाल कलराज मिश्र यांना दोन वेळेस विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याची विनंती केली होती. मात्र, दोनही वेळेस ही विनंती राज्यपाल कलराज मिश्र यांनी फेटाळून लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थान मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

राजस्थान मधील कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंड केल्यानं राजस्थानचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशोक गेहलोत यांच्या सरकारकडे सध्या बहुमत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अशोक गेहलोत विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यासाठी आग्रही आहेत. आता जर अधिवेशन झालं नाही तर कॉंग्रेसला आपले आमदार फुटण्याची भीती आहे. त्यामुळं कॉंग्रेस विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यासाठी आग्रही आहे.

आज देशभरात कॉंग्रेस पक्ष भाजप विरोधात "लोकतंत्र बचाओ-संविधान बचाओ" असं आंदोलन करत आहे. त्यातच आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन बातचित केल्याची माहिती दिली.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्यपाल कलराज मिश्र यांच्या वर्तनाबाबत बातचित केली. तसंच सात दिवसांपुर्वी लिहिलेल्या पत्राबाबत सांगितल्याचं माध्यमांना म्हटलं आहे.

Similar News