मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी...

Update: 2022-05-06 11:52 GMT

:राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसाकडून नुकताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते त्यानंतर आता परळी न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात 2008 च्या प्रकरणात जामीन पत्रावरून दाखल केले आहे त्यामुळे आता राज ठाकरे अडचणीत सापडले आहेत.

परळी जिल्हा न्यायालयाने 2008 मधील एका प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे 2008 झाली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती या प्रकरणात गुन्हा दाखल करून हे प्रकरण न्यायालयात गेले होते त्यानंतर राज ठाकरे यांना अनेकदा न्यायालयात उपस्थित राहण्यास संदर्भात आदेशित करण्यात आले होते परंतु राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नाहीत त्यामुळे जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट दाखल करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News