राज ठाकरे यांची आज सभा, महागाईवर बोलणार का?

राज ठाकरे यांनी वाढत्या महागाईवर बोलायला हवं का? तुमची प्रतिक्रिया नक्की द्या...

Update: 2022-05-01 05:44 GMT

राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेल्या सभांमध्ये राज्य सरकारवर निशाणा साधताना धार्मिक मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मशिदीवरील भोंग्यावरून राज यांनी राज्य सरकारला ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे खाली घेतले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेनंतर काही मनसैनिकांना मशिदीसमोर भोंगे लावण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळं राज्यात काही भागात तणाव देखील निर्माण झाला. त्यानंतर राज्य सरकारने तातडीची बैठकही बोलावली होती. राज यांच्या या भूमिकेने सरकारने भोग्यांच्या आवाजावर मर्यादा लावण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

राज यांनी मांडलेल्या मुद्द्याची राज्य सरकारने तात्काळ दखल घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा होत आहे. राज ठाकरे यांच्या दोन्ही सभांचं वैशिष्ट म्हणजे राज यांनी वाढत्या महागाईवर, बेरोजगारीवर चकार शब्द काढलेला नाही. राज ठाकरे यांनी मांडलेल्या मुद्द्यांची सरकार तात्काळ दखल घेते. त्यामुळं राज यांनी वाढत्या महागाईवर बोलावं अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.

सध्या देशभरातील जनता वाढत्या महागाईने भरडून निघाली आहे. येत्या काळात रासायनिक खतांची भाव वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहू शकतं. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. खाद्य तेलासह घरातील किराणा मालाचे भाव वाढले आहेत. कोळसा टंचाईमुळे देशात वीजेचं संकट निर्माण झालं आहे. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडेले आहेत.

या वाढत्या महागाईमुळं सर्वसामान्य माणूस अक्षरश: मेटाकुटीला आलेला असताना राज ठाकरे या विषयावरुन सरकारला घेरणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Tags:    

Similar News