राहुल गांधींची लडाखमध्ये बाईक राईड, भाजप मंत्र्यांने मानले आभार

Update: 2023-08-20 05:59 GMT

Rahul Gandhi Bike Ride In Ladakh: लडाखमधील जगप्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठी काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी त्यांचे वडील आणि भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. याठिकाणी पोहोचण्यासाठी राहुल गांधींनी बाईकचा वापर केला. त्याची चर्चा सध्या सगळीकडे जोरदार सुरू झालीय. राहुल यांच्या बाईक राईडची दखल भाजपनंही घेतलीय. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी यासंदर्भात राहुल गांधींचे आभार मानले.

राहुल गांधी यांनी लडाख इथल्या बाईक राईडचे फोटो स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. २५ ऑगस्टपर्यंत राहुल लडाखच्या दौऱ्यावर असतील. काँग्रेसनंही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटरवर राहुल यांच्या लडाख दौऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. किरण रिजिजू यांनीही राहुल यांच्या बाईक राईडच्या फोटोंचा एडिट केलेला एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी राहुल गांधींचे आभार मानलेत. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी २०१२ मध्ये लडाखला कारमधून गेल्याचं दिसत आहे. खराब रस्त्यातून त्यांची कार जातांना दिसत आहे. तर सध्याच्या बाईक राईडचे फोट त्याच व्हिडिओमध्ये खालच्या बाजूला वापरण्यात आले त्यात राहुल गांधी डांबरी रस्त्यावरून बाईक राईड करताना दिसताहेत. हा व्हिडिओ शेअर करतांना किरण रिजिजू म्हणाले, “राहुल गांधींचे आभार त्यांनी नरेंद्र मोदी सरकारने लडाखमध्ये बांधलेल्या उत्तम रस्त्यांचं एका अर्थाने प्रमोशन केलं आहे. पूर्वी त्यांनी काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पर्यटन कशापद्धतीने वाढत आहे हे दाखवलं आणि श्रीनगरमधील लाल चौक येथे आपला तिरंगा शांततेत अभिमाने फडकता येऊ शकतो हे सुद्धा त्यांनी दाखवलं," अशी उपहासात्मक पोस्ट रिजिजू यांनी केलीय.


லடாக்கில் ராகுல் காந்தியின் பைக் சவாரிக்கு பாஜக அமைச்சர்கள் நன்றி தெரிவித்துள்ளனர்

Tags:    

Similar News