शरद पवारांवरची कारवाई म्हणजे राजकीय संधीसाधूपणा – राहुल गांधी

Update: 2019-09-27 06:14 GMT

‘ईडी’ने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आज शरद पवार ईडी कार्यालयात चौकशीसाठी स्वतःहून जाणार आहेत. याप्रकरणी आता राजकारण तापायला लागलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याविषयावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.

‘शरद पवार हे महत्वाचे विरोधी पक्षनेते नेते आहेत. या नेत्याला सरकारने लक्ष्य केलंय. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांना एक महिना राहीलेला असताना अशाप्रकारे कारवाई करणे म्हणजे राजकीय संधी साधून घेण्यासारखं आहे’ असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

https://twitter.com/RahulGandhi/status/1177457571055030273

Similar News