मुख्य सचिव अजॉय मेहतांवर अशोक चव्हाण यांची नाराजी

Update: 2020-06-11 01:45 GMT

राज्याचे मुख्य सचिव म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचे नाक, कान आणि डोळे असतात. राज्य मंत्रिमंडळाचा कारभार योग्य दिशेने नेण्यासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी मुख्य सचिवाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्येक मंत्र्यांशी समन्वय साधून त्या त्या विभागातील योजना मंत्रालयामार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मुख्य सचिवांवर असते.

मुख्य सचिवांचे काम करत असताना मत्री आणि अधिकारी यांच्यात स्नेहाचे संबंध निर्माण होतात अशी अनेक उदाहरणे आहेत. पण सध्याचे मुख्य सचिव मेहता (Ajoy Mehta)यांचे मंत्र्यांशी स्नेहाचे संबंध तर सोडाच पण हे संबंध कटू झाले आहेत याचा दाखला माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan )यांनी दिला आहे. अशोक चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. त्यावेळी साधी विचारपूसही मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी केली नाही, अशी खंत अशोक चव्हाण यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केली.

अजॉय मेहता यांचा फोन येणे हे जरी अपेक्षित नसलं तरी एक काळजी म्हणून मुख्य सचिवांनी मंत्र्यांच्या तब्येती बाबत विचारपूस करणं हे महत्त्वाचं असतं पण तेही अजॉय मेहता यांच्याकडून झाले नाही, असे चव्हाण यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे. मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही खंत व्यक्त केली आहे.

Full View

Similar News