युक्रेनपाठोपाठ युरोपवरही हल्ला करण्याचा पुतीन यांचा गंभीर इशारा

Update: 2022-03-06 07:13 GMT

रशिया युक्रेन युध्दाचा अकरावा दिवस उजाडला आहे. मात्र अजूनही युध्द थांबलेले नाही. परंतू नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यावरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी संताप व्यक्त करत युक्रेनपाठोपाठ युरोपवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ले चढवून दोन अणूउर्जा प्रकल्प ताब्यात घेतले आहेत. तर रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरातील देशांनी रशियाविरोधात एकत्र येत रशियाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबरोबरच अमेरीकेने रशियावर कठोर निर्बंध घातले आहेत. त्यापार्श्वभुमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्याची मागणी नाटोकडे केली आहे. मात्र नाटोने याबाबत निर्णय घेतला नाही. परंतू नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित केल्यास युरोपवर हल्ला करण्याचा इशारा पुतीन यांनी दिला आहे.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नाटोला विनंती केली आहे की, रशियाच्या हल्ल्यापासून युक्रेनचे रक्षण करण्यासाठी युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यात यावा. परंतू नाटोने अजूनही युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित केले नाही. मात्र जर नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित केला तर युरोपवर हल्ला करण्याचा गंभीर इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिला.

पाश्चिमात्य देशांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युध्द न थांबविल्यास रशियावर कठोर निर्बंध घालण्याचा इशारा दिला आहे. तर नाटो देशांनी युक्रेनमध्ये नो फ्लाय झोनची घोषणा करणे म्हणजे युध्दाची घोषणा समजण्यात येईल. त्यामुळे युक्रेनचे अस्तित्वच नष्ट करण्यात येईल, अशा गंभीर इशारा पुतीन यांनी दिला आहे. तर युक्रेनमध्ये नो फ्लाय झोन घोषित केल्यास अण्वस्राचा वापर केला जाईल, असा थेट इशारा पुतीन यांनी युरोपीय देशांना दिला आहे.

दरम्यान नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित न केल्याने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटोवर सडकून टीका केली आहे. तर नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित न करणे म्हणजे रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याला हिरवा झेंडा दाखवण्यासारखे आहे, असे मत वोल्डोमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केले.

नाटोचे जेन्स स्टॉल्टबर्ग यांनी सांगितले की, नाटोने रशियाकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी नो फ्लाय झोनची केलेली मागणई युक्रेनने नाकारली आहे. कारण अशा निर्णयामुळे अण्वस्र सज्ज असलेल्या रशियाकडून युरोपात मोठे युध्द होऊ शकते. त्यामुळे या युध्दात अनेक देश सहभागी होऊन या युध्दाचे रुपांतर महायुध्दात होऊ शकते. त्यामुळे नाटोने युक्रेनमध्ये नो फ्लाय झोन घोषित करण्याची विनंती नाकारली आहे.

Tags:    

Similar News