पुतीन बायडेन यांना ढोलसारखे वाजवतात, ट्रम्प यांची जहरी टीका

Update: 2022-02-27 13:47 GMT

मुंबई : रशिया आणि युक्रेन युध्द सुरू आहे. जगाची दोन गटात विभागणी सुरू आहे. तर बायडन यांनी तिसरे महायुध्द टाळण्यासाठी रशियावर कठोर निर्बंध लादण्याचे आवाहन जगभरातील देशांना केले आहे. तर त्यापाठोपाठ अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी बायडन यांच्यावर टीका करत पुतीन बायडन यांना ढोलसारखे वाजवत असल्याचे सांगत बायडन यांच्यावर निशाणा साधला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी अशाच प्रकारचे वक्तव्य करत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे कौतूक केले होते. मात्र त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या विधानावरून पलटी मारत पुतीन यांच्यावर टीका करत युक्रेनची बाजू घेतली आहे.

ट्रम्प म्हणाले की, रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला पर्णपणे चुकीचा आहे. तसेच हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे असा प्रकार घडायला नको होता. पण जर मी राष्ट्राध्यक्ष असतो तर असा प्रकार घडला नसता, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

यावेळी ट्रम्प यांनी अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यावर टीका केली. तसेच मी राष्ट्राध्यक्ष असताना युध्द झाले नाही. कारण मी जगाला युध्दातून बाहेर काढले. पण सध्या कमकुवत असलेल्या राष्ट्राध्यक्षामुळे जग भीतीच्या सावटाखाली आहे. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांना ढोलसारखे वाजवत आहेत. मात्र मी राष्ट्राध्यक्ष असतो तर युध्द घडलेच नसते, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

दरम्यान अमेरीकेने तिसऱ्या महायुध्दापासून वाचायचे असेल तर सर्व देशांनी रशियावर निर्बंध घावावेत, असे आवाहन जो बायडन यांनी केले होते. तसेच अमेरीकेने युक्रेनला 350 डॉलरची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. मात्र भारताने या दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याची आवाहन केले आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे पंतप्रधान वोल्डोमीर झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे.

Tags:    

Similar News