राज्यमंत्री बच्चू कडूंची संघटना का उतरली रस्त्यावर?

Update: 2020-02-04 09:20 GMT

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रहार संघटना रस्त्यावर उतरली आहे. मुंबईच्या अंधेरीमधील फ्युचर जनरल इंडिया विमा कंपनी विरोधात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी शिदोरी आंदोलनास सुरूवात केलीय. शेतकऱ्यांना छळणाऱ्या पीक विमा कंपनीस सरळ केल्याशिवाय शेतकरी मागे हटणार नाहीत असा अशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

यापुर्वीही भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं पीक विमा कंपनीविरोधात विराट मोर्चा काढला होता. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसह पीक कंपनीविरोधात शिदोरी आंदोलन पुकारलं आहे.

पीक विमा कंपनीकडून दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचा छळ केला जातोय. २०१८ रब्बी हंगामातील पीक विमा अजुनही थकीत ठेवलाय अशी शेतकऱ्यांची खंत आहे. एकट्या नगर जिल्ह्यातच ६२००० शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. जोपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत फ्युचर जनरल इंडिया विमा कंपनी कार्यालयातच शेतकऱ्यांचा मुक्काम असणार असा इशारा प्रहार संघटनेनं दिलाय.

Similar News