खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 10 जणांना मृत्यू 

Update: 2023-01-13 05:06 GMT

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे गावांच्या दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्य मार्गावरील ज्ञानेश्वर मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास  खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने या भीषण अपघातात झाला. यात खाजगी बस आणि ट्रकचा चक्काचूर झाला असून या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पुरुष, सहा महिला तर दोन चिमुकल्याचा समावेश असल्याची पोलिसांची माहिती आहे. या अपघातात खाजगी बस मध्ये 35 ते 45 प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. पंधरा ते वीस गंभीर जखमी झाले असून या जखमींवर सिन्नर येथील खाजगी तर शिर्डी येथील सुपर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु करण्यात आले आहे. या अपघाता प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अधिक तपास पोलीस करत आहे .

३५ पेक्षा जास्त प्रवाशी जखमी

मिळालेल्या माहितीनुसार अपघातील ट्रक शिर्डीहून सिन्नरच्या दिशेने जात होते. तर खासगी बस सिन्नरच्या दिशेन येत होती. पाथरे या गावाजवळ हा अपघात घडला आहे. या अपघातात साधारण ३५ प्रवाशी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पुरुष, सहा महिला तर दोन चिमुकल्याचा समावेश असल्याची पोलिसांची माहिती आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. मात्र आता पोलीस आणि बचावपथकाच्या माध्यमातून ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News