पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कमला हॅरिस यांची भेट

Update: 2021-09-24 04:51 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील दोन दिवसांपासून अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांची द्विपक्षीय भेटींच्या मालिकेतील दुसरी बैठक अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत झाली. दरम्यान यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाच्या महामारीमध्ये अमेरिकेकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुरुवातीला व्हाईट हाऊसमध्ये खासगीत चर्चा झाली आणि त्यानंतर शिष्टमंडळ स्तरावरील बैठक पार पडली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारत भेटीचे आमंत्रण देखील दिले. त्याचवेळी, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या पहिल्या बैठकीत अमेरिकेच्या उपराष्ट्रपती हॅरिस यांनी पाकिस्तानमधील दहशतवादाच्या भूमिकेचा उल्लेख केला आणि देशाला दहशतवादी गटांचे समर्थन थांबवण्यास सांगितले आहे. सोबतच त्यांनी पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानी भूमीवर अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत अशा दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून त्याचा अमेरिका आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही.

Tags:    

Similar News