विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी घेतली सफाई कर्मचाऱ्यांची भेट

Update: 2020-04-09 08:45 GMT

कोरोना व्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भावानं जगाला स्वच्छतेचं महत्व मोठ्या प्रमाणात समजायला लागलं आहे. आता लोक स्वत: स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आपण सर्वांनी स्वच्छ राहावं म्हणून दिवस रात्र झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचं काय?

सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. अशातच देशातील बहुतांश जनता घरात बसलेली आहे. अशा वेळी स्वच्छता कर्मचारी मात्र, आपली सेवा रात्रंदिवस निभावत आहेत.

अशा कर्मचाऱ्यांची विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज सकाळी साडेसहा वाजता दहीसरमधल्या सफाई चौकींवर जाऊन भेट घेतली. आस्थेने चौकशी केली. त्यांचं कौतुक केलं. या संकट काळात न डगमगता ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत

Similar News