प्रदीप शर्मा अडचणीत!

Update: 2021-06-02 07:17 GMT

मुंबईतल्या एका व्यापाऱ्याला प्रदीप शर्माच्या नावाने धमकी दिल्या प्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात किशोर भाई रतिलाल शहा या व्यक्ती विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोरने तक्रारदार व्यापाऱ्यास तो प्रदीप शर्माच्या जवळचा असल्याचे सांगून तक्रारदाराची मु.पो. कुनेनामा खंडाळा ता.मावळ, जि.पुणे, येथील प्लॉट क्र.42 व प्लॉट क्र. 05 ABC मधील एकूण सव्वाचार एकर क्षेत्रफळाच्या मोकळया भुखंडातील हिस्सा प्रदीप शर्मा यांचे नाव वापरून दोन्ही भुखंडाचे पुढील व्यवहार प्रदीप शर्मा करतील. अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

या प्रकरणी व्यापाऱ्याच्या तक्रारीनुसार बीकेसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळं आता प्रदीप शर्मा यांचं या प्रकरणात नाव आल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपुर्वीच सचिन वाझे प्रकरणात प्रदीप शर्मा यांची एनआयए ने चौकशी केली होती.


कोण आहेत प्रदीप शर्मा?

प्रदीप शर्मा हे एक माजी पोलिस अधिकारी आहेत.

पोलिस दलात त्यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख आहेत.

त्यांनी 300 पेक्षा अधिक एन्काउंटर केले आहेत.

सचिन वाझे यांच्याशी जवळीक

2019 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर मुंबईतून निवडणूक लढले, त्यामुळं या प्रकरणाशी विरोधक शिवसेनेचा संबंध जोडू शकतात.

सध्या ते नालासोपारा येथे पीएस फाउंडेशन येथे एक एनजीओ चालवतात.

Tags:    

Similar News