गुडविन ज्वेलर्सच्या मालकांना पोलीस कोठडी

Update: 2019-12-15 03:44 GMT

गुडविन ज्वेलर्सचे अकराकरण भावंडांना ठाण्याच्या एमपीआयडी न्यायालयाने येत्या २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. गुडविन ज्वेलर्सचे प्रमुख मालक आणि मुख्य आरोपी सुनीलकुमार मोहनन अकराकरण दोघी भावंड फरार असताना त्यांनी केरळ आणि तामिळनाडू परिसरात वास्तव्य केलं होतं.

अकारकरण भावंड ठाणे न्यायालयातील एमपीआयडी न्यायालयात शरण आल्यानंतर दोघांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले. शासकीय प्रकीया पुर्ण झाल्यानंतर दोघांना ठाणे शहारतील नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुडविन ज्वेलर्स प्रकरणातील गुन्ह्यात न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्यासमोर हजर केले.

नौपाडा पोलिसांच्या तपासा पूर्ण झाल्यावर त्यांना डोबिवली, शिवाजीनगर या गुन्ह्यात कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसचं या प्रकरणातील पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेलचे पोलीस उपायुक्त करीत आहेत.

Similar News