लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हे वाढले, २५५ लोकांना अटक

Update: 2020-06-11 03:04 GMT

लॉकडाऊनच्या (lockdown) काळात राज्यात सायबर संदर्भात ४६७ गुन्हे दाखल झाले असून २५५ व्यक्तींना अटक करण्यात आल्याची माहित महाराष्ट्र सायबर (Maharashtra Cyber) विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे. राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ९ जूनपर्यंत ४६७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९३ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १९० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. tiktok विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत.

हे ही वाचा...


राज्यातील मंत्री आणि मुख्य सचिवांचा संघर्ष शिगेला, मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी

मुख्य सचिव अजॉय मेहतांवर अशोक चव्हाण यांची नाराजी

राज्यातील हा जिल्हा कोरोनामुक्त !

अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणाच्या चौकशीबाबत सरकारचा निर्णय

तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५५ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

Similar News