सरकारने सावकाराचं काम करू नये: राहुल गांधी

Update: 2020-05-16 08:55 GMT

कॉंग्रेस नेते राहुल गांधी वारंवार सरकारला कोरोना व्हायरस बाबत सूचना करत आहे. त्यातील काही सूचना सरकारने स्विकारल्याचं दिसून येतं. मात्र, राहुल गांधी आणि जागतिक अर्थतज्ञ नोबेल पारितोषित विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्या चर्चेतून जनतेला त्यांच्या खिशात थेट पैसा द्यावा. अशी मागणी समोर आली होती. मात्र, मोदी सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये ही मागणी मान्य करण्यात आलेली नाही.

या संदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकारांशी केलेल्या चर्चेमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज हे एकप्रकारचं कर्ज आहे. सरकारनं कर्ज देऊ नये. सरकारने सावकाराचं काम करू नये. मजुरांना कर्जाची नव्हे, तर पैशाची गरज आहे. सरकारनं शेतकरी आणि मजुरांच्या खिशात डायरेक्ट पैसे जमा करावेत. अशी सूचना राहुल गांधी यांनी सरकारला केली आहे.

आर्थिक पॅकेजचा पुनर्विचार करावा

भारत संकटात सापडला आहे. आपले कोट्यवधी लोक बिना अन्नपाण्याचं रस्त्यावर हिंडत आहे. त्यामुळे मला दु:ख होत आहे. मोदी सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचा पुनर्विचार करावा आणि गरिबांना थेट डायरेक्ट पैसे द्यावेत अशी मागणी राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केली आहे.

इव्हेन्ट नाही

लॉकडाऊन उठवण्याचा विचार अभ्यासपूर्ण करावा लागणार आहे. हा एक इव्हेंट नाहीये. आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं आपल्याला रक्षण करायचं आहे.

वादळाला नुकतीच सुरुवात

कोरोनाच्या संकटाची ही सुरुवात आहे. हे एक वादळ आहे. यापेक्षा मोठं वादळ आता येईल. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांचे हात बळकट करायला पाहिजे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनामुळं मोठं संकट येणार आहे.

आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करु नका

भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करु नका, ते रेटिंग नंतर सुधारु शकेल. सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल असा सल्ला देखील राहुल यांनी मोदी सरकारला दिला आहे.

 

Full View

Similar News