मोदी सरकार 2.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना पत्र

Update: 2020-05-30 03:17 GMT

दुसऱ्या टर्मच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लिहिलेल्या पत्रात कलम३७० रद्द करणे, राम मंदिर बांधण्यास परवानगी, तिहेरी तलाक पद्धत रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा अशा महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख करत देशाच्या विकासाला गती दिल्याचा दावा केला आहे. कोरोनाच्या संकटामुळे वर्षपूर्तीचा सोहळा न करता पत्राद्वारे संवाद साधत असल्याचं मोदींनी म्हटले आहे.

या पत्रात मोदींनी पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममधील सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली आहे. त्याचबरोबर २०१४ नंतर भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यात यश आल्याचा दावा करत देशाने मोठ्या सुधारणा पाहिल्या आहेत, असंही मोदींनी म्हटले आहे. यात संरक्षण दल प्रमुख, लष्करातील पेन्शनचा प्रश्न यांचा उल्लेख केला आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे प्रगतीला खिळ बसली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सक्षम आरोग्य व्यवस्था असलेल्या देशांच्या तुलनेत प्रचंड लोकसंख्या आणि विविध समस्या आणि कमी साधनसामग्री यामुळे भारतात कोरोनामुळे हाहाकार उडेल असा दावा केला गेला होता, पण भारतानं जगाचा हा दावा खोटा ठरवल्याचं मोदींनी म्हटले आहे. स्थलांतरित मजुरांचे हाल, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती याचा उल्लेख त्यांनी केला आहे. पण भारत या संकटातून उभा राहिल आणि जगाला आर्थिक पुनरुज्जीवनाचे उदाहरण घालून देईल असेही मोदींनी म्हटले आहे.

Similar News