अनलॉक - 1 : पंतप्रधानांची आज मन की बात !

Update: 2020-05-31 02:04 GMT

देशात लॉकडाऊनच्या चार टप्प्यांनंतर आता परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन(lockdown) 30 जूनपर्यंत वाढवला आहे, पण रेडझोन आणि कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे आता लॉकडाऊनऐवजी अनलॉक असे नाव देण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्याऊनच्या प्रत्येक टप्पाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी देशाला उद्देशून भाषणं केली आहेत़. पण अनलॉक १ च्या आधी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून भाषण केले नाही. त्यामुळे आजच्या मन की बात (Mann Ki Baat ) कार्यक्रमातून मोदी देशाला कोणता संदेश देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा...


जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व वाढणार, ट्रम्प यांचे संकेत

मोदी सरकारच्या १ वर्षातील निर्णयांचा अर्थ काय?

मोदी सरकारचं यश आणि अपयश

कोरोना रोखण्याचा ‘मुंढे पॅटर्न’!

मोदी 2.0 एक वर्ष पुर्ण, पाहा काय झाले देशाचे हाल?

लॉकडाऊनमुळे वाढलेली बेरोजगारी, बंद पडलेले उद्योगधंदे, स्थलांतरित मजूर गावी परतल्याने निर्माण झालेला तुटवडा, मजुरांचे प्रवासात झालेले हाल याबद्दल मोदी काय बोलतात याबाबतही उत्सुकता आहे.

Similar News