ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ चं निधन, 70 वर्ष होत्या ब्रिटनच्या सम्राट…

Update: 2022-09-09 03:53 GMT

ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबर ला निधन झालं. त्या ९६ वर्षाच्या होत्या. बकिंघम पॅलेस ने रात्री साधारण 11 वाजता या संदर्भात माहिती दिली आहे. एलिजाबेथ या गेल्या ७० वर्षापासून ब्रिटेनच्या महाराणी होत्या.

बकिंघम पॅलेस ने दिलेल्या माहितीनुसार ८ सप्टेंबरला दुपारी महाराणी एलिजाबेथ यांचे बालमोराल इथं निधन झालं. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच पॅलेसमधून त्या सर्व सरकारी काम करत होत्या.ब्रिटेन च्या नव्या पंतप्रधान लिज ट्रस यांना 6 सप्टेंबरला त्यांनी याच पॅलेसमध्ये शपथ दिली.

जगभरातील राजेशाही संपुष्टात आली आहे. मात्र, लोकशाहीची जननी असलेल्या इंग्लंड मध्ये राजेशाही कायम आहे. इथल्या राजाला राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार नाही. हे एक सांकेतिक पद आहे.

एलिजाबेथ 1952 पासून ब्रिटेन च्या महाराणी झाल्या. मात्र, 1953 ला त्यांचा राज्यभिषेक झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा प्रिंस चार्ल्स ब्रिटेनचा नवीन सम्राट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून त्यांच्या भेटीच्या आठवणी जागवल्या आहेत.

ते म्हणाले…

एलिजाबेथ द्वितीय या आपल्या काळातील सर्वोत्तम शासक होत्या. दुःखाच्या या प्रसंगी माझ्या संवेदना राणी एलिजाबेथ यांच्या कुटुंबाच्या आणि ब्रिटेनच्या जनतेच्या सोबत आहेत.

2015 आणि 2018 ला मी युकेच्या दौऱ्यावर होतो. तेव्हा मी महाराणीला भेटलो होतो. एका बैठकी दरम्यान त्यांनी मला एक रूमाल दाखवला. राणी एलिजाबेथ यांनी सांगितलं महात्मा गांधी यांनी त्यांच्या लग्नात तो भेट दिला होता.

Tags:    

Similar News