कोरोनामुळे योगाचे महत्त्व आणखी वाढले - पंतप्रधान मोदी

Update: 2020-06-21 04:21 GMT

आज जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो आहे या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संदेश दिला, "कोरोनासारख्या संकटात जगाला योगाचे महत्त्व अधिक गांभीर्यानं समजले आहे.

योगामुळे आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनतं. त्यामुळे प्रत्येकानं व्यायाम करण्याबरोबरच योगालाही आपल्या आयुष्याचं भाग बनवावं," असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.

२०१५ मध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर करण्यात आला. योगामुळे श्वसनक्रिया सुदृढ होते. कुठल्याही आजाराशी सामना करायचा असेल तर आपली प्रतिकारशक्ती चांगली असावी लागते.

योगामुळे आपली प्रतिकारशक्ती आणि पचनक्रिया चांगली होते, असेही मोदींनी सांगितले आहे. योग हा धर्म, लिंग, रंग, विचारसरणी याच्या पलीकडे आहे असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Full View

Similar News