काँग्रेसचा 'तो' दावा खोटा?, PIB ने केलं फॅक्ट चेक

Update: 2022-10-27 13:18 GMT

काँग्रेस ने ट्विटरवर ट्विट करत रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट हे ५० रूपये झाल्याचा दावा केला होता. पण त्यांचा हा दावा PIB ने फॅक्ट चेक करत खोटा ठरवला आहे. आणि ट्विट करत असं काही नसल्याचं सांगितलं आहे.

काँग्रेसनं काही दिवसांपुर्वी ट्विट करत एक फोटो पोस्ट केला त्यात प्लॅटफॉर्म तिकीटाबाबत क्या से क्या होगया देखते देखते असं म्हटलं आहे. शिवाय काँग्रेसच्या काळातील ३ रूपये आणि भाजपच्या काळातील ५० रूपये अशी तुलना दाखवली आहे.

पण त्यांच्या या ट्विटचं फॅक्ट चेक करत PIB ने जी खरी माहिती आहे ती ट्विट करत सांगितली आहे. शिवाय कांग्रेस चा दावा गोंधळात टाकणारा आहे असं म्हटलं आहे. " भारतीय रेल्वे चं प्लॅटफॉर्म तिकीट ५० रूपये झालं असल्याचा खोटा दावा एका ट्विट मध्ये करण्यात आला आहे. रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत १० रूपये आहे. विशेष परिस्थितीत गर्दी आणि दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणुन ही किंमत वाढवली जाऊ शकते." असं म्हटलं आहे.

PIB च्या या ट्विट नंतर बेरोजगार या अकाउंटवरून ५० चं तर ठाऊकनाही पण दिल्ली स्थानकात तर १० चे ३० म्हणजेच तीन पट जास्त वाढवण्यात आलं आहे अशी प्रतिक्रीया दिली आहे.

Tags:    

Similar News