लसीकरणाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी पेट्रोल पंप सील; राज्यातील पहिली कारवाई

Update: 2021-11-22 02:47 GMT

औरंगाबाद जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात असे आदेश जारी केले होते. मात्र आदेशाचे पालन न करणाऱ्या औरंगाबादचे बाबा पेट्रोल पंप जिल्हाधिकारी यांनी सील करण्याचे आदेश दिले आहे.

लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच ग्राहकांना पेट्रोल देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी बाबत संबंधित यंत्रणेला तपासणीचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी स्वतः बाबा पेट्रोल येथे पाहणी केली. तेव्हा no vaccination no petrol या आदेशाचा भंग केल्याचे , मास्कचा वापर न करणे लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी न करणे , अशा गोष्टी आढळल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बाबा पेट्रोल पंप सांयकाळी 8.30 वाजता सील करण्यात आले आहे.विशेष म्हणजे लसीकरणाची खात्री न करता पेट्रोल दिल्याप्रकरणी राज्यातील ही पहिली कारवाई आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरण टक्केवारी खूपच कमी असल्याने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत स्वतः जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर लसीकरण नाही तर सुविधा नाही असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होते.मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आज जिल्हाधिकारी यांनी स्वतः पाहणी करून, कारवाई केली आहे.

Tags:    

Similar News