सोलापूरात सुशील, सुशीलकुमार नावाच्या व्यक्तींना मोफत ५०१ रुपयांचं पेट्रोल

Update: 2021-09-04 12:56 GMT

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस सोलापुरात भन्नाट पद्धतीने साजरा केला. दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत असल्याने आज सोलापुरातील 'कारगीर' पेट्रोल पंपावर ५०१ रुपयांचं पेट्रोल मोफत देण्याचे आलं आहे. हा लाभ फक्त ज्यांचं नाव 'सुशील' किंवा 'सुशीलकुमार' आहे. अशा व्यक्तींनाच देण्यात आला आहे.

पेट्रोल भरायला येत असताना ग्राहकाने 'आधार कार्ड' सोबत बाळगणे आवश्यक आहे. आज सकाळी ०९ ते दुपारी ०१ वाजेपर्यंत हा उपक्रम सुरु ठेवला होता. पेट्रोल भरायला येणाऱ्या प्रत्येकाचा यावेळी फेटा बांधून सन्मान ही करण्यात येत होता. त्यामुळे आज पहाटेपासूनच कारगीर पेट्रोल पंपावर नागरिकांनी रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळालं.

Tags:    

Similar News