पार्थ पवार असे का वागले? नवाब मलिकांनी दिले उत्तर

Update: 2020-08-11 02:23 GMT

उपंमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण आणि राम मंदिराबाबत घेतलेल्या भूमिकांवरुन सध्या राज्यात वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती.

हे ही वाचा...

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत UGCचा निर्णय रद्द करता येतो का? : सर्वोच्च न्यायालय

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

अत्यावश्यक सेवा वगळता सामान्यांसाठी तूर्तास लोकलची दारं बंदच

तर राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी जय श्रीरामचा नारा देत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या होत्या. “आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” अशी टीका शरद पवार यांनी केली होती. पण पार्थ पवारांनी भूमिपूजनाच्या दिवशी वेगळी भूमिका घेत टविट केले होते.

पण पार्थ पवार यांच्या या भूमिकांवर आता राष्ट्रवादीने स्पष्टीकरण देत पार्थ पवार यांचे वय आणि नवखेपणा याचे कारण देत पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. पार्थ पवार तरुण आहेत नवीन आहेत त्यांना अनुभव कमी आहे त्यामुळे अशा गोष्टी घडतात. पण त्यामुळे काही मतभेद होणार नसल्याची प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.

Similar News