पाकिस्तानने भारताला विनंती करत कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू करण्याची मागणी केली

Update: 2021-11-10 03:20 GMT

नवी दिल्ली :  पाकिस्तानने भारताला पुन्हा एकदा आपल्या बाजूने कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करावा असे आवाहन केले आहे. कर्तारपूर हे शिख धर्मीयांचे पवित्र स्थळ आहे, त्यांना गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त कर्तारपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी 9 नोव्हेबंर 2019 मध्ये गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंती निमित्त कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन केले होते. पण, अवघ्या काही महिन्यातच जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने हा मार्ग बंद करण्यात आला.

आता, कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू करावा असं पाकिस्तानने म्हटले आहे. याबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आतापर्यंत भारताने आपल्या बाजूने कर्तारपूर कॉरिडॉर सुरू केलेला नाही. 17 ते 26 नोव्हेंबरदरम्यान कर्तारपूरमध्ये गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त येत्या

मोठा उत्सवाचे आयोजन करण्यात आला आहे. त्यामुळे शिख बांधवांना कर्तारपूरमध्ये येण्याची परवानगी द्यावी. पाकिस्तान येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे असं म्हटलं आहे.

त्याआधी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंगळवारी पंजाबस्थित डेरा बाबा नानकला भेट दिली. त्यांनी भारत पाक सीमेवरूनच पाकिस्तानमध्ये असलेल्या कर्तारपूर साहिबचे दर्शन घेत, प्रार्थना केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आता दोनही देशांनी कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा एकदा सुरू करावा, ज्यामुळे शिख बांधवांना कर्तारपूरला जाऊन दर्शन घेता येईल.

Tags:    

Similar News