चिदंबरम यांच्यावर अटकेची तलवार, काय आहे कारण?

Update: 2019-08-20 11:18 GMT

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी आईएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दोनही याचिका न्यायालयानं फेटाळल्या आहेत. त्यामुळे चिदंबरम यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे. न्यायालयाने चिदंबरम यांच्यावरील दोनही याचिकेवरील निर्णय 25 जानेवारीला झालेल्या सुनावणीत राखून ठेवला होता. यावर आज न्यायालयाने आपला निकाल दिला.

चिदंबरम हे प्रश्नांपासून स्वत:ला वाचवत आहेत, त्यामुळे त्यांना ताब्यात घेणं गरजेचं असल्याचं सांगत ईडी आणि सीबीआयनं चिदंबरम यांच्या याचिकेला विरोध केला होता. सीबीआय आणि ईडी या तपास यंत्रणांच्या मते पी चिदंबरम मंत्री असताना त्यांनी आईएनएक्स मीडिया समुहाला 2007 ला परदेशातून 305 कोटी रुपये घेण्यासाठी एफआईपीबी ला मंजूरी दिली होती.

Similar News