विरोधी पक्षातील नेत्यांना परत पाठवलं, कश्मिरातील स्थिती अजूनही सामान्य नाही

Update: 2019-08-24 12:47 GMT

काश्मिरमधली स्थिती सामान्य असल्याबाबत केंद्र सरकार वारंवार सांगत असलं तरी आज विरोधी पक्षातील 11 नेत्यांच्या शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावरूनच परत पाठवण्यात आलं आहे. राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी आज काश्मिर मध्ये भेट घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरकार काश्मिरमधली स्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न करत असताना राजकीय नेत्यांनी येऊन परिस्थिती बिघडवू नये असं आवाहन काश्मिरच्या माहिती विभागातर्फे करण्यात आलं.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सीताराम येचुरी, मनोज झा, गुलाम नबी आझाद तसंच इतर नेत्यांनी आज श्रीनगरमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीहून प्रयाण केलं मात्र त्यांना श्रीनगर विमानतळावरूनच परत पाठवण्यात आलं. काश्मिरमधल्या जनतेशी आपल्याला बोलायचं आहे, असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे, मात्र 20 दिवस झाले तरी अजूनही सरकारने काश्मिरमध्ये जनजीवन सामान्य करण्यासाठी निर्बंध हटवलेले नाहीत.

Similar News