कांदा बोलेना...कांदा चालेना !!!

Update: 2019-12-13 06:13 GMT

कांद्याच्या महागाईने लोकांच्या डोळ्यात असं काही पाणी आणलंय की आता हॉटेलातसुद्धा फलक लागू लागलेत...कांदा नही मिलेगा...नो ओनियन...कांदा मिळणार नाही !!!

साधारणत: हॉटेलात जेवणाची कुठलीही ऑर्डर केल्यानंतर जेव्हा प्रतिक्षेचा काळ संपायची वेळ येते, तेव्हा टेबलावर ताटवाट्या येऊ लागतात आणि त्या पाठोपाठ येतो लोणच्यासोबत चा कांदा. ही मांडणी, आपण दिलेली ऑर्डर लवकरच टेबलावर येऊ घातलीय, यासाठीचं वातावरण तयार करण्यासाठी असते. अगदी काऊंटरवरून एखादं पार्सल घेतलं तरी, त्यातील पदार्थांना अनुसरून कांदासुद्धा स्वतंत्रपणे बांधून दिला जातो. पण आता हॉटेलांनी काही दिवसांसाठी ही पद्धत बंद केली आहे.

हे ही वाचा...

चाळीसगाव धुळे महामार्गावर वाहनधारकांची कसोटी, मागील ४ महिन्यात २५ ते ३० अपघात

महिलांनो अन्याय अत्याचार झाल्यास कोणत्या कायद्याचा आधार घ्याल?

कामाठीपुरातील वेश्या म्हणतात ‘इकडे या पैसे दया, पाहिजे ते करा पण बलात्कार थांबवा…!’

कांद्याने शंभरी ओलांडली आणि तो आता जेवणासोबत देणं हॉटेलांना परवडेनासं झालं आहे. त्यामुळे जेवणात जरी कांद्याचा वापर होत असला तरी जेवणासोबतचा आणि पार्सलमधून मिळणारा कांदा गायब झाला आहे.

मुंबईतील मुलुंड मधील एका हॉटेलवाल्यांने माहिती दिली की त्यांच्या हॉटेलला केवळ ऑर्डरसोबत वेगळा देण्यासाठी दिवसभरात 20 ते 30 किलो कांदा लागतो. सध्याच्या दराप्रमाणे हा खर्च दिवसाला तीन हजारांपर्यंत जातो, जो परवडणारा नाही. त्यांनी असं म्हटलं की ग्राहकांची ही गैरसोय तात्पुरती आहे. कांद्याचे भाव उतरले की पुन्हा आम्ही पार्सलमधूनही कांदा द्यायला सुरुवात करू.

Similar News