मॅक्समहाराष्ट्र वर पुन्हा एकदा सायबर अटॅक

Update: 2019-12-25 11:50 GMT

मॅक्समहाराष्ट्र चं युट्यूब चॅनेल पुन्हा एकदा हॅक करण्यात आलं आहे. मध्यंतरी ऐन निवडणुकांच्या काळात मॅक्समहाराष्ट्रचं युट्यूब हॅक करण्यात आलं होतं. त्यानंतर सायबर पोलिसांनी सुरक्षेशी संबंधित सुचवलेल्या सर्व उपाययोजना केल्यानंतरही मॅक्समहाराष्ट्र वर पुन्हा दुसरा सायबर अटॅक करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे एका महिन्याच्या अंतराने झालेला हा दुसरा सायबर हल्ला आहे. मॅक्समहाराष्ट्र या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. अशा हल्ल्यांना आम्ही कालही घाबरलो नव्हतो. आजही घाबरणार नाही.

हे ही वाचा

मॅक्समहाराष्ट्र चे यूट्युब चॅनल हॅक !

जनतेच्या प्रश्नांसाठी मॅक्समहाराष्ट्र ची निर्मिती झाली आहे. या जनतेच्या प्रश्नांसाठी मॅक्समहाराष्ट्र असे कितीही हल्ले झाले तरी शांत बसणार नाही. मॅक्समहाराष्ट्र जनतेच्या समस्या कायम मांडत राहील. मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी या सायबर हल्ल्याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Similar News